राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुसंडी,आमदार महेंद्रशेट थोरवे यांचा पुढाकार..
भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख मा. उद्धव साहेब ठाकरे यांनी दिलेले,ग्रामीण भागात शिवसेना मजबूत करा,या आदेशाचे पालन करत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारून राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत तालुक्यातील बीड पंचायत समिती विभाग अध्यक्ष व तालुक्यात नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते रमेश शांताराम कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज दिनांक ९ जुलै २०२१ रोजी आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या निवासस्थानी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
त्यांच्या या पक्षप्रवेशाने वास-याच्या खोंड्यात भविष्यात शिवसेना मजबूत होणार असून राजिप चे उपाध्यक्ष तथा शिक्षण-आरोग्य -क्रीडा सभापती सुधाकरशेट घारे यांच्या बालेकिल्याला एकप्रकारे सुरुंगच लावल्याची चर्चा येथे ऐकण्यास मिळत आहे.कर्जत तालुका राष्ट्रवादीचे जेष्ठ पदाधिकारी व पोलीस मित्र संघटना कोकण प्रदेश अध्यक्ष रमेश शांताराम कदम यांच्या नेतृत्वाखाली तिवणे , साळपे गावातील एकनाथ हिरामण कोळंबे, सदाशिव नारायण कदम, गणेश अनंत कदम, समीर वसंत कदम, वासुदेव शांताराम कदम यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बीड जिल्हा परिषद विभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकरशेट घारे व रवींद्र देशमुख यांना निवडून आणण्यासाठी रमेश कदम यांचे अथक प्रयत्न होते . अन्याय – अत्याचारा विरोधात लढवय्या स्वभाव असलेले रमेश कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेने व ज्यांना निवडून दिले त्यांनी कधीच विश्वासात घेतले नाही की बीड पंचायत समिती विभाग अध्यक्ष या नात्याने अधिकाराने निर्णय क्षेत्रात देखील कधीच विचारले नसल्याने दिलेले आश्वासन न पाळल्याने तसेच प्रभागातील गोरगरीब नागरिक,आदिवासी बांधव यांची प्रशासकीय कामे देखील होत नसल्याने शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे रमेश कदम यांनी सांगितले.
या प्रवेशामुळे बीड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून शिवसेना संघटना वाढीसाठी याचा खूप मोठा फायदा भविष्यात रमेश कदम यांच्या रूपाने होणार आहे.या पक्षप्रवेशप्रसंगी आमदार महेद्रशेट थोरवे, जिल्हा प्रमुख तथा माझी आमदार मनोहरशेट भोईर, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, जिल्हा महिला संघटक रेखाताई ठाकरे , जिल्हा सल्लागार भरतभाई भगत, विधानसभा संघटक संतोषशेट भोईर, तालुकाप्रमुख उत्तमदादा कोळंबे, तालुका संघटक शिवराम बदे, उपतालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, युवा सेनेचे उपतालुका अधिकारी प्रमोद सुर्वे,विभागप्रमुख नारायण पायघुडे, रमेश लोभी, शैलेश पाटील यासह अनेक कार्यकर्ते शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.