Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये आरोग्य शिबीर...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये आरोग्य शिबीर संपन्न !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) शरीर हि संपत्ती आहे हेच उद्दिष्ट समोर ठेवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्याची तपासणी शिबीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रवादी भवन , दहिवली – कर्जत येथे आयोजित केले होते.या आरोग्य शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत – खालापूर मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी परिसरातील व कर्जत शहरातील अनेक नागरिकांनी व महिला , तरुणांनी या आरोग्य शिबिरात तपासणी करून घेतली.यावेळी या आरोग्य शिबिरास माजी आमदार सुरेशभाऊ लाड समवेत , जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव , जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण , गटनेते शरदभाऊ लाड , जेष्ठ नेते मधुकर घारे , माजी नगराध्यक्ष तथा शहर कार्याध्यक्ष राजेशदादा लाड , युवक ता अध्यक्ष सागरभाऊ शेळके , कर्जत शहर अध्यक्ष रणजितशेठ जैन , ता. कार्याध्यक्ष जगदीश ठाकरे , ओबीसी सेल अध्यक्ष राजू हजारे , विद्यार्थी संघटनेचे ता. अध्यक्ष आर्केश काळोखे , शहर अध्यक्ष झहीर खान , युवक कर्जत शहर अध्यक्ष सोमनाथ पालकर , नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , माजी नगराध्यक्ष सौ. रजनीताई गायकवाड , महिला कर्जत शहर अध्यक्षा तथा नगरसेविका पुष्पा दगडे ,मधुरा चंदने , भारती पालकर , सुवर्णा निलधे , संतोष थोरवे , ऋषभ लाड , अमिर मणियार , श्रीकांत पाटील , प्रशांत खडे , बाबू आंबवणे , त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरस्वती एज्युकेशन सोसायटी , डॉ.एन .वाय. तासगावकर रायगड हॉस्पिटल यांचे तर्फे रायगड हॉस्पिटल टिम – डॉ. साबिहा इनामदार , डॉ. अलिशा हरपुडे , डॉ. नमिता घरत , नर्स – समृद्धी , नर्स – मानसी , जनसंपर्क अधिकारी महेश हुकारे , सुनील रसाळ , गाडीवाहक – प्रविण म्हसे ,आदींनी सहकार्य व नागरिकांची तपासणी करून आरोग्य शिबीर यशस्वी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page