Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा सुधाकर शेठ घारे यांचा तरुणांसाठी स्तुत्य उपक्रम !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा सुधाकर शेठ घारे यांचा तरुणांसाठी स्तुत्य उपक्रम !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व कर्जत नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरुण पिढी ही पक्षाची ताकद असते व तरुणांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ” मतदान हेच श्रेष्ठ दान ” आहे म्हणूनच नवीन पिढीस मतदान नोंदणी व आपले नाव मतदान यादीत आहे की नाही , पत्ता बदल , असे विविध समस्या सोडविण्यासाठी याद्या पूनसर्वेक्षण मोहीम आज कर्जत नगरपरिषद हद्दीतील आकुर्ले प्रभागात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार व रायगडचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण नेतृत्व महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे तसेच आमदार अनिकेत दादा तटकरे व कर्जत खालापूर मतदार संघाचे मार्गदर्शक सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली नवीन मतदार नोंदणी आणि मतदार यादी पूनसर्वेक्षण मोहीम बुधवार दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी १० ते ५ या दरम्यान श्री हनुमान मंदिर – आकूर्ले येथे राबिवण्यात आले .यावेळी आकुर्ले परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी प्रभागातील स्थलांतरित नागरिकांना आणि नवीन मतदारांना आपल्या मतदानाचा अधिकार बजवता यावा , माझा सामान्य नागरिक व महिला भगिनी तहसील कचेरीच्या फेऱ्यामध्ये अडकू नये , यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा सुधाकर शेठ घारे यांच्या सूचनेने कर्जत शहरातील प्रत्येक प्रभागात नवीन मतदार नोंदणी शिबीर राबविण्यात येणार आहेत , या आदेशानुसार कर्जत शहर सरचिटणीस कु. वैभव डाबे व कर्जत शहर उपाध्यक्ष श्री कुमेश मोरे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते . या शिबिराचे उदघाटन मा. पक्ष नेते मधुकर शेठ घारे यांच्या हस्ते करण्यात आले . आज या शिबिराचे प्रथम पुष्प आकुर्ले प्रभागात गुंफले असून तरुण वर्गाने जास्तीत जास्त संख्येने नवीन मतदान नोंदणी करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा राजिपचे मा. उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांचे हात मजबूत करण्यास सर्वांनी साथ द्या , असे आवाहन यावेळी जिल्हा सरचिटणीस बॉबी शेठ वाघमारे यांनी सर्वाँना केले.

यावेळी या शिबिरास रायगड जिल्हा युवक सरचिटणीस मा .बॉबी शेठ वाघमारे , अनिल चव्हाण , सुजित मोरे , रूपेश मोरे , राजू डाबे , मोहन मांडवकर , विनायक काणेकर , हरिश्चंद्र मुने , प्रशांत मोरे , हरेश साटमकर , अजय धनवटे , व्यंकटेश धनवटे , महेंद्र धनवटे , अल्पेश फाळे , रोहित फाळे , तेजस जाधव , सूजित देशमुख , लोकेश गायकवाड , लोकेश सुतार , आदि मान्यवर उपस्थित होते . यावेळी आकुर्ले परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
- Advertisment -

You cannot copy content of this page