![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
मावळ (प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका लीगल सेलच्या उपाध्यक्ष पदी अँड. तृणाल दिपक सिसोदीया
(काळे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे .माजी मंत्री मदन बाफना यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार सुनील (अण्णा) शेळके यांच्या हस्ते निवडीचे पत्रक प्रदान करण्यात आले.
पक्ष श्रेष्टीना अभिप्रेत असणारी पक्ष संघटना बांधण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील तसेच पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते नेहमीच कार्यान्वित राहतील असा विश्वास पक्ष श्रेष्टींकडून व्यक्त करत अँड तृणाल दिपक सिसोदीया यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी माजी मंत्री मदन बाफना,आमदार सुनील अण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश खांडगे ,राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल तालुका अध्यक्ष अँड सोमनाथ पवळे,लोणावळा शहर युवक अध्यक्ष विनोद होगले,जिल्हा सरचिटणीस परेश बनसोडे,लोणावळा मुस्लिम को.ऑप.बँकेचे संचालक जाकीर खलिफा, अनिकेत गायकवाड, नीरज कचरे,पार्थ बारोट,प्रवीण ओसवाल यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.