राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर डॉक्टर सेल अध्यक्षपदी डॉ. डॉली अगरवाल यांची नियुक्ती…

0
29

लोणावळा : लोणावळा शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर्स सेल अध्यक्ष पदी डॉ. डॉली अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार , राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती फौजियाताई खान , खासदार सौ . सुप्रियाताई सुळे , अजितदादा पवार, जयंतराव पाटील , सौ . रुपालीताई चाकणकर व मावळचे आमदार सुनिल ( आण्णा ) शेळके यांना अभिप्रेत असणारी पक्ष संघटना बांधण्यासाठी डॉ डॉली या नेहमी प्रयत्नशील राहणार तसेच पक्ष बळकटीसाठी व पक्ष मजबुत करण्यासाठी पक्षाची ध्येय – धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या कार्यरत असणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे .

याबाबत शहर कार्याध्यक्षा सौ . संयोगिता नामदेव साबळे, शहर अध्यक्षा सौ . उमा राजेश मेहता, तालुका महिला अध्यक्षा सौ . दिपाली संदीप गराडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रक प्रदान करण्यात आले.

डॉ. डॉली अगरवाल यांचे आरोग्य क्षेत्रातील कार्य अप्रतिम आहे. त्यांनी मागील कोरोना काळात सलग दोन वर्ष कोरोना सेंटर व कोरोना बाधित होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची घरोघरी जाऊन देखभाल व सेवा केली. त्यांच्या या अप्रतिम कार्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली असून त्यांची लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेल अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.