मावळ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगांव शहर उपाध्यक्ष पदी सौ.भाग्यश्री सुहास विनोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार , राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती फौजियाताई खान , खासदार सौ . सुप्रियाताई सुळे , मा.ना.अजितदादा पवार मा.ना.जयंतराव पाटील, मा. सौ.रुपालीताई चाकणकर व मावळचे आमदार मा.सुनिल ( आण्णा ) शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा सौ. दिपाली संदीप गराडे, वडगांव महिला शहराध्यक्षा सौ. पद्मावती राजेश ढोरे यांच्या हस्ते निवडीचे पत्रक देण्यात आले.
तसेच पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सौ. भाग्यश्री विनोदे ह्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून शुभेच्छा देण्यात आल्या.