राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी प्रसाद पाटील..

0
59


खोपोली- दत्तात्रय शेडगे

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी काम करीत असून या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणारे खालापुरातील प्रसाद पाटील यांची राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटना रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.


खालापूर तालुक्यातील बीडखुर्द गावातील सुपुत्र प्रसाद पाटील यांची ओळख असून प्रसाद पाटील यांनी आजवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्याची नुकतीच राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटना रायगड जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती केली असून या पदाचा पदभार 25 प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन देण्यात आल्याने जिल्हाध्यक्ष निवडीनंतर पाटील यांच्यावर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याप्रसंगी आमदार अमोल मिटकरी,आमदार संदीप क्षिरसागर, आमदार अतुल बेनके, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यासह प्रदेश पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.