Friday, February 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गट कर्जत खालापूर मतदार संघ अध्यक्ष पदी...

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गट कर्जत खालापूर मतदार संघ अध्यक्ष पदी सौ. पूजा सुर्वे यांची नियुक्ती !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाच्या कर्जत – खालापूर मतदार संघ अध्यक्ष पदी ऍड. सौ. पूजा प्रताप सुर्वे यांची नुकतीच निवड विधान परिषदेचे आमदार अनिकेत दादा तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आली . सदरची निवड बुधवार दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या पक्षाच्या ” निर्धार सभेच्या ” पूर्व संध्येला करण्यात आल्याने सौ. पूजा सुर्वे यांच्या तळागाळातील असलेला जनसंपर्क व सामाजिक कार्याचा फायदा पक्षाला होणार आहे . त्यांच्या निवडीचे पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे , महिला व बाल कल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत खालापूर मतदार संघाचे नेतृत्व सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा अध्यक्षा – सौ. उमा संदिप मुंढे यांच्या स्वाक्षरीने कर्तृत्ववान आमदार अनिकेत दादा तटकरे यांनी दिले आहे.

सौ. पूजा प्रताप सुर्वे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेली अनेक वर्षापासून कार्यरत आहेत . यापूर्वी त्यांच्याकडे ” रायगड जिल्हा महिला उपाध्यक्ष ” म्हणून पद होते . कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे वास्तव्यास असलेल्या सौ . पूजा प्रताप सुर्वे यांचा त्या पंचक्रोशीत दांडगा जनसंपर्क आहे . कॉलेज जीवनापासून सौ.पूजा सुर्वे महापुरुषांचे विचाराने प्रेरित होऊन ” राजमाता जिजाऊ फाउंडेशनची ” स्थापना करून त्यांनी आपल्या परिसरात महिलांसाठी खूप मोठे कार्य केले आहे . उच्चशिक्षित व कर्जत दिवानी न्यायालयात वकील असलेल्या पूजा सुर्वे यांनी यापूर्वी शिक्षिका बनून विद्यार्थ्यांना घडविण्याचे देखील महान कार्य केले आहे , तर त्यांनी कॉम्प्युटर टीचर , एल आय सी एजंटचे देखील कामकाज पहात आहेत.

” राजमाता जिजाऊ फाउंडेशन ” च्या माध्यमातून त्यांनी मोफत दाखले वाटप शिबीर , उत्पन्नाचे दाखले , पॅन कार्ड , आधार कार्ड , जातीचे दाखले , रेशन कार्ड , डोमेसाईल , निराधार महिलांना पेन्शन शिबिर इत्यादी विविध ५०० पेक्षा जास्त नागरिकांना व अशिक्षित महिलांना सर्व प्रकारचे दाखल्यांचे वाटप पळसदरी परिसरात दरवर्षी शिबिर घेवून करत असतात , तर ” छत्रपती शाहू महाराज ” जयंती निमित्त पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये जवळजवळ साडेचारशे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप दरवर्षी करतात . सर्व शाळांमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप त्यानंतर निराधार – अपंग – विधवा महिलांना संस्थे मार्फत पेन्शन योजना कार्यक्रम , पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगारांची नोंदणी जिजाऊ फाउंडेशन मार्फत करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे . फाउंडेशन मार्फत तीस महिला बचत गटांची स्थापना करून त्यांना कर्ज देऊन महिला सबलीकरण व आर्थिक मजबुतीसाठी प्रयत्न केले.
कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून स्वताच्या पायावर उभे राहण्यास सक्षम केले . सिंधुताई सपकाळ यांचा जाहीर कार्यक्रम घेऊन त्यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाने महिलांना भविष्यातील घडामोडीत त्याचा फायदा झाला . पळसदरी ठाकुरवाडी शाळेत मुलांना खेळाचे साहित्य वाटप तसेच पूरग्रस्तांसाठी बिस्किट वाटप केले, गोरगरिबांसाठी आरोग्य शिबीर घेतले व कौटुंबिक जीवनातुन मन मोकळे होण्यासाठी महिलांची ” विरंगुळा सहल ” नेली. कोरोना महामारीच्या काळात देखील आदिवासी महिलांना अन्न धान्य व इतर सामानाचे वाटप केले. शिवजयंतीच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले , त्यात ५५० विद्यार्थ्यांनी ,तरुणींनी , महिलांनी भाग घेतला , ” छत्रपतींची प्रेरणा ” या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना दिली . जिजाऊ फाऊंडेशनने गोरगरीब आदिवासी महिला , नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवले .” आपले सरकार ” हे कार्यालय उघडून गरीब – गरजू – अशिक्षित महिलांना सर्व प्रकारचे दाखले काढण्यास मदत करतात.
महिलांच्या न्याय हक्कासाठी स्वतः वकील होऊन कायद्याच्या लढाईत त्यांची बाजू लढण्यासाठी महिला सक्षमीकरणात ” एक पाऊल पुढे टाकून ” या आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात महिलांच्या हक्कासाठी प्रसंगी ” मुकुटमणी ” झाल्याची ख्याती त्यांची सर्वत्र आहे . त्यांची महिलांसाठी असलेली तळमळ खरचं वाखाणण्याजोगी असून ” राजमाता जिजाऊं फाउंडेशनच्या ” संस्थापक अध्यक्ष असलेल्या ऍड. सौ. पूजा सुर्वे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत खालापूर मतदार संघाचे अध्यक्ष पद दिल्याने त्यांचे सक्षम कार्यास शोभेल असेच हे पद मोठे असल्याने या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद नक्कीच वाढणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष मा. सुनिलजी तटकरे यांना अभिप्रेत असणारी पक्ष संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशिल राहून पक्षांच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरण सर्वसामान्या पर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील , यासाठी मी सदैव प्रयत्न करेन , असे मत नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत खालापूर मतदार संघाच्या अध्यक्ष ऍड. सौ. पूजा सुर्वे यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page