राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी वैभव साळुंखे यांची निवड..

0
163

Koराष्ट्रवादी पदवीधर संघाच्या जिल्हाध्यक्षपदी माढा तालुक्यातील वैभव साळुंखे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या मान्यतेने पदवीधर संघाचे प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील यांनी ही निवड जाहीर केली.अशी माहिती राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हा समन्वयक महेश माने यांनी दिली.


पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या वडाळा येथील निवासस्थानी सदरच्या पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यात जिल्हा कार्याध्यक्षपदी विक्रांत पाटील(बार्शी) , सुभाष गोडसे(मंगळवेढा) तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी अतिष गायकवाड(बार्शी)याना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना बळीराम काका साठे यांनी जास्तीतजास्त पदवीधर मतदार नोंदणी व्हायला हवी. लवकरात लवकर तालुका कार्यकारिणी जाहीर करून संघटनेची बांधणी करा. शरद पवार साहेबांचे विचार आणि महाआघाडी सरकारचे काम घरोघरी पोहोचवा असे आवाहन केले.


यावेळी राष्ट्रवादी चे दक्षिण सोलापूर तालुका कार्याध्यक्ष बिपीन करजोळे, सीताराम बाबर विपुल मराठे, विनोद गुंड ,चेतन मोरे आदी उपस्थित होते.