Saturday, April 26, 2025
Homeपुणेपिंपरी चिंचवडराष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी डॉ. किरण तुळसे आले लंडन वरून पिंपरीत…

राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी डॉ. किरण तुळसे आले लंडन वरून पिंपरीत…

पिंपरी : (प्रतिनिधी श्रावणी ) कामत चिंचवड मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदाताई तुळसे आणि लक्ष्मण तुळसे यांचे चिरंजीव डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूल मध्ये मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. डॉ. किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. नंदाताई तुळसे या मागील अनेक वर्षांपासून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहेत.
आई, वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण आगामी काळात काम करू. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील प्रत्येकाची राष्ट्रीय जबाबदारी आहे. आपल्या प्रत्येकाच्या एका मताने लोकशाही बळकट होत असते. त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो असे डॉ. किरण यांनी सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page