राष्ट्रीय समाज पक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन..

0
109

खोपोली(दत्तात्रय शेडगे)
राष्ट्रीय समाज पक्षाच्या रायगड जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ही बैठक बुधवार दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी पेण आणि माणगाव येथे होणार आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री मा. श्री महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती आणि विधानसभा यांच्या निवडणूकिसाठी आतापासून जोरदार तयारी केली असून, यासाठी रायगड जिल्ह्यातही मोठ्या हालचाली घडत आहेत.


रायगड जिल्ह्यात आगामी काळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि नवीन पदाधिकारी यांना पक्षात संधी देऊन संघटना वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, ही बैठक उत्तर रायगड यांची पेण येथे सकाळी 10 वाजता तर दक्षिण रायगड यांची दुपारी 3 वाजता माणगाव येथे पार पडणार आहे.

या बैठकीला रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रासप कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे आणि रासप रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे-धनविकर यांनी केले आहे.