
प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खालापूर : राष्ट्रीय समाज पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्ह्याची आढावा बैठक रविवार दिनांक 24 आक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता माणगाव येथे पार पाडली.राष्ट्रीय समाज पक्षाने रायगडात पक्ष संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न चालू केले असून, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात नुकत्याच नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका येत असून यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार मोर्चे बांधणी चालू केली आहे.
त्याच बरोबर रायगड जिल्ह्यात पक्ष संघटना बांधणीसाठी जोरदार प्रयत्न करणार असून, यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठकीचे आयोजन कऱण्यात आले होते. या बैठकीला माजी मंत्री तथा रासपचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतडे, कोकण प्रभारी आणासाहेब रुपणवर, कोकण अध्यक्ष भगवानभाई ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली असून, कनेक्ट इंडिया स्वराज रॕली अंतर्गत नागरीकांना पायाभूत सुविधांसह अनेक विकासात्मक मुद्दांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
व गाव तिथे शाखा संकल्पना मांडण्यात आली. अशा अनेक विषयावर चर्चा या बैठकीला करण्यात आली. या बैठकीला रासपचे जेष्ठ नेते श्रीकांतभाई भोईर, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे- धनवीकर, दक्षिण जिल्हा प्रमुख सुर्यकांत टेंबे, दक्षिण जिल्हा सचिव बाळारामदादा ढवळे , माणगाव तालुका प्रमुख रविंद्र सुतार , पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .