राष्ट्रीय समाज सहाय्यक समिती मार्फत कर्तृत्वान महिलांचा सन्मान….

0
33

वडगाव : – कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा राष्ट्रीय समाज सहाय्यक समिती मार्फत गौरव करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त दि.6 मार्च रोजी वडगाव मावळ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात कोरनाच्या महामारीत स्वतःचा व कुटुंबाचा विचार न करता इतरांसाठी कायम तत्पर राहून धडाडीने लोकांची सेवा करणाऱ्या महिला सफाई कामगार व आशा स्वयंसेविका यांचा सत्कार करून त्यांना साड्या देवून त्यांचा गौरव करण्यात आला .

यावेळी कार्यकामासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पी.एस.आय. प्राजक्ता धापटे ,आशा घाटे , राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीचे राष्ट्रीय व यशदाचे आर.टी.आय.प्रशिक्षक प्रविणजी जिंदम , राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्चना म्हाळसकर थिटे , सचिव डॉ . आरती म्हाळसकर , परदेशी , उपाध्यक्ष गोविंद जाधव , राष्ट्रीय सल्लागार रामचंद्रजी कुऱ्हाडे , मावळ तालुकाध्यक्ष डॉ.काळे , महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा ऊर्मिला छाझड , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जितेंद्र कुडे , पुणे जिल्हा कार्याध्यक्षा सविता जाधव , मावळ महिलाध्यक्षा ज्योती जाधव , मावळ तालुका संघटक सविता दाभाडे , मावळ तालुका महिलाध्यक्षा नेहा गराडे , मावळ तालुका कार्याध्यक्षा वैशाली जामखेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली. तदनंतर प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करत महिलांना मार्गदर्शन केले. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलांना साड्या देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरीस आभार प्रदर्शन करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.