रासपची कोकण कार्यकारिणी बरखास्त , नविन कार्यकारिणी लवकरच करु- भगवान ढेबे..

0
50


खोपोली- दत्तात्रय शेडगे

राष्ट्रीय समाज पक्षाची कोकण विभागाची कार्यकारीणी ही बरखास्त करण्यात आली असुन नव्याने राष्ट्रीय समाज पक्षाची ची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात येणार असल्याची माहिती रासपचे कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री विद्यमान आमदार महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे जोरदार संघटन वाढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
त्यातच कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाला आलेली मरगळ दूर करून कोकणात पुन्हा रासपचे संघटन वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत,यासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकणातील राष्ट्रीय समाज पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने लवकरच रासपची कोकणाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून इच्छुक कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन रासपचे कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे यांनी केले आहे.