Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडरासपच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष पदी संपत ढेबे तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष पदी...

रासपच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष पदी संपत ढेबे तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष पदी सूर्यकांत टेम्बे..

खोपोली( दत्तात्रय शेडगे)
राष्ट्रीय समाज पक्षाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष पदी संपत बाबू ढेबे यांची तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष पदी सूर्यकांत टेंबे नुकतीच निवड करण्यात आली.राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक नुकतीच पेण व मागणाव येथे पार पडली.

यावेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष पदी युवा नेते संपत बाबू ढेबे तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष पदी सूर्यकांत चंद्रकांत टेंबे यांची नियुक्ती करण्यात आली, तर पेण तालुका रासप दिव्यांग आघाडी अध्यक्ष आनंद रामचंद्र ढवळे, खोपोली शहर अध्यक्ष महेश धनंजय शिंदे यांचीही यावेळी निवड करण्यात आली.


आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. तर कोकणात रासपचे संघटन वाढण्यासाठी जोरदार पर्यंत केले असून, त्यासाठी नवीन तरुणांना संधी देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ह्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ता केल्या आहेत.

त्यामुळे पक्षाला उभारी मिळून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न होईल.यावेळी रासप कोकण प्रभारी अण्णासाहेब रुपणवर,कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे धनविकर ,सुभाष एनकर, हसनमुखलाल शहा, हरेश ढेबे, विजय उघडे, लक्ष्मण मरगाळे, दयानंद खरात , उमेश पाटील, आनंद ढवळे, महेश शिंदे , रविंद्र सुतार, राजेंद्र निकम, विजय कोलगे, सरीता चेरफले , अनिकेत सुतार, प्रविण चेरफले आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..

- Advertisment -

You cannot copy content of this page