रासपच्या रायगड जिल्हा प्रभारीपदी भगवान ढेबे..

0
77


खोपोली- दत्तात्रय शेडगे

राष्ट्रीय समाज पक्षाची कोकण कार्यकारिणी नुकतीच बरखास्त करण्यात आली असून राष्ट्रीय समाज पक्षाच्या रायगड जिल्हा प्रभारी पदी भगवान ढेबे यांची नुकतीच निवड करण्यात आली.


राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्ष संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न चालू असून यातच रासपची कोकणची कार्यकारिणी बरखास्त करून पुन्हा नवीन तरुणांना संधी देण्यासाठी जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

रायगड कोकण, रत्नागिरी, आणि कोकणात रासपची नवीन कार्यकारिणी रायगड जिल्हा प्रभारी अध्यक्ष भगवान ढेबे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी जाहीर होणार आहे.रासप रायगड जिल्हा प्रभारी अध्यक्ष भगवान ढेबे हे सद्य कोकण दौऱ्यावर असून ,११ तारखेला सिंधुदुर्ग ,१२ तारखेला रत्नागिरी , तर १३ तारखेला रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.


रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग आणि कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार असून कोकणात राष्ट्रीय समाज पक्ष आणि पक्षाची विचारधारा जानकर साहेबांचे विचार, घराघरात पोहचवण्यासाठी पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असल्याचे प्रभारी अध्यक्ष भगवान ढेबे यांनी सांगितले.


भगवान ढेबे हे २०१३ पासून राष्ट्रीय समाज पक्षात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असून पक्षाचे एकनिष्ठ आणि कट्टर जानकर साहेबांची विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्याची दखल पक्षाने घेतली असून त्यांना पुन्हा रायगड जिल्हा प्रभारी पदी निवड केली आहे.