Wednesday, September 27, 2023
Homeपुणेलोणावळाराहुल शेट्टी हत्ये प्रकरणातील दोघांना 31 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी :आणखी दोन...

राहुल शेट्टी हत्ये प्रकरणातील दोघांना 31 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी :आणखी दोन संशयितांना चौकशी साठी घेतले ताब्यात…..

लोणावळा : लोणावळा शिवसेना माजी शहर प्रमुख राहुल शेट्टी यांच्यावर भर चौकात मारेकऱ्यांनी गोळया घालून धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला होता.

त्या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये पाच जनांसह एका अज्ञाता विरोधात 302, 120 ( ब ), 34, हत्यार कायदा 3(25 ), 4(25), 27 अंतर्गत गुन्हा दाखल करून सुरज अगरवाल व दिपाली भिल्लारे या दोघांना ताब्यात घेतले होते. आज त्या दोघांना वडगाव न्यायालयात हजर केले असता वडगाव न्यायालयाने त्या दोघांना पुढील तपासासाठी पाच दिवस 31 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तसेच आज लोणावळा शहर पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा ( एलसीबी ) ने आणखी दोन संशयितांना चौकशी साठी ताब्यात घेतल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली.पुढील आरोपींच्या शोधात पोलीस पथके सक्रिय झाली असून पथकास वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. लवकरच मुख्य आरोपीस ताब्यात घेतले जाईल असे लोणावळा शहर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -