लोणावळा : लोणावळा शिवसेना माजी शहर प्रमुख राहुल शेट्टी यांच्यावर काल राहत्या घराजवळील येवले चहाच्या स्टॉल वर चहा पीत असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी मारेकऱ्यांनी त्यांच्यावर तीन गोळया घालून धारदार शस्त्राने वार करत त्यांच्यावर हल्ला केला होता.
त्यात राहुल शेट्टी गंभीर जखमी झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुल शेट्टी यांना तात्काळ उपचारासाठी लोणावळ्यातील परमार हॉस्पिटल येथे दाखल केले तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. जयचंद चौकात भर दिवसा ही घटना घडल्याने लोणावळा शहर पूर्ण हादरून गेले होते. लोणावळा शहराला झावणीचे स्वरूप आले होते. त्याच राहुल शेट्टी हत्ते प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेबाबत सौम्या राहुल शेट्टी ( वय 36, रा. घर नं. 61, एफ वार्ड, जयचंद चौक लोणावळा ) यांनी लोणावळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.फिर्यादी नुसार आरोपी 1) मोबीन इनामदार ( वय 35, रा. भैरवनाथ नगर, कुसगाव, लोणावळा ), 2) कादर इनामदार ( वय 33, रा. भांगरवाडी, लोणावळा ), 3)सुरज अगरवाल ( वय 42, रा. वर्धमान सोसायटी, लोणावळा ), 4)दिपाली भिल्लारे ( वय 39, रा. लोणावळा ), 5) सादिक बंगाली ( वय 44, रा. गावठाण, लोणावळा ), यांच्या समवेत एका अज्ञात व्यक्ती विरोधात गु. र. नं. 487/2020, भादवी कलम 302, 120 (ब )34, हत्यार कायदा 3(25), 4(25) 27 प्रमाणे लोणावळा शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपी दिपाली भिल्लारे व सुरज अगरवाल ह्या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा अहवाल मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो वडगाव मावळ यांना सुपूर्द केला असून लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास लोणावळा शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव करत आहे.