Tuesday, April 16, 2024
Homeपुणेतळेगावरिक्षा दुचाकीला धडकल्याने जाब विचारणाऱ्या महिले बरोबर गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकास अटक…

रिक्षा दुचाकीला धडकल्याने जाब विचारणाऱ्या महिले बरोबर गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकास अटक…

मावळ (प्रतिनिधी):रिक्षेची धडक बसल्यानंतर रिक्षा चालकाला जाब विचारणाऱ्या महिलेला शिवीगाळ करून गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवार दि.10 रोजी तळेगाव वडगाव रोडवर घडली.
याबाबत महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दुचाकी वरून जात असताना शिवाजी चौकाच्या बाजूने आरोपी रिक्षा चालक त्याची रिक्षा भरधाव वेगात घेऊन आला असता फिर्यादीच्या दुचाकीला धकड बसली. यावेळी फिर्यादी दुचाकीच्या नुकसानाबद्दल रिक्षा चालकाला विचारायला गेली असता आरोपीने फिर्यादी यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ करत फिर्दीच्या मनात लज्जा उत्पन्न केली यावरून तळेगाव दाभाडे पोलीसांकडून रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page