लोणावळा ६/१२/२०२०- भारतिय घटनेचे शिल्पकार बौध्दीसत्व महामानव प. पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाणदिनी.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( ए) राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन आज करण्यात आले होते.
सर्व प्रथम लोणावळा येथील शासकीय रुग्णालयाच्या आवारात असलेल्या डॉ बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळळ्याला पुणे युवक जिल्हाध्यक्ष मा.अंकुशजी चव्हाण, मावळ तालुकाध्यक्ष मा.दत्ताशेट यादव, युवक तालुका अध्यक्ष मा. चंद्रकांत ओव्हाळ, मावळ तालुका उपाध्यक्ष मा. सुनिलभाऊ सोनवणे, ता.उपाध्यक्ष मा. गुलाबजी आगे,मावळ तालुका उपाध्यक्ष मा. विजयजी कांबळे,मावळ तालुका सचिव कांबळे, कामशेत शहर अध्यक्ष मा. दिनेशजी शिंदे, तालुका युवक उपाध्यक्ष मा. संजयजी गायकवाड,मावळ तालुका युवक उपाध्यक्ष मा. निलेशजी गायकवाड, तालुका युवक सरचिटणीस मा. कुनालजी घोडके, मावळ युवक कोषाध्यक्ष ,मा जे के गरड, संघटक मावळ मा.सचिन साळवे, नाणे मावळ विभाग अध्यक्ष मा.किशोरजी वंजारी, पवनमावळ अध्यक्ष किरनजी गायकवाड, पवनमावळ युवक अध्यक्ष किरन चव्हान, वडगाव खडकाळ विभाग युवक कार्याध्यक्ष मा.अमोलजी ओव्हाळ,लोणावळा शहर अध्यक्ष मा. शिंदेसाहेब, लोणावळा शहर युवक अध्यक्ष मा. निलेशजी देसाई, पाटण शाखाध्यक्ष मा.पारुल घोडके, कामशेत शहर उपाध्यक्ष मा. लखन शिंदे, मा. पिंन्टुशेट रंधे मा.प्रतापजी वाघमारे,मा.रोहित ओव्हाळ, व इतर अनेक कार्यकर्ते समवेत लोणावळा येथे त्या महामानवास पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले यांच्या ही पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले, त्या नंतर लोणावळा गावठाण येथिल बौध्द विहारात ज्या ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ( अस्ती ) चे जपनुक केलीली आहे त्याठिकाणी पुष्प वाहुन पंचाग प्रणाम करुन, वंदना घेवुन अभिवादन करण्यात आले.
डॉ बाबासाहेबांच्या पवित्र हस्ती ह्या सिदार्थ नगर लोणावळा येथिल बौद्ध विहारात आहेत, हे सत्य काही समाज बांधवांनी समाज पर्यंत पोहचू दिले नाही, ते आम्ही महाराष्टातील प्रत्येक समाज बांधवा पर्यंत पोहचवू आसे आश्वासन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे पुणे जिल्हा युवक आध्यक्ष मा अंकुशभाऊ चव्हाण यांनी बोलताना सांगितले,,, त्यानंतर कामशेत येथील बौध्दविहात अभिवादन करुन, पुढे तळेगाव येथील डॉ बाबासाहेबांच्या निवासस्थानी जावून बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.