रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद रायगड जिल्हाध्यक्ष पदी उत्तम गायकवाड..

0
104

(कर्जत-गुरुनाथ नेमाणे)

दि.11कर्जत तालुक्यातील डिकसळ-शांतीनगर येथील यांची रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद रायगड जिल्हाध्यक्ष पदी नेते उत्तम गायकवाड यांनी नुकतीच नियुक्ती करण्यात आली

सामजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)यांचे संपुर्ण महाराष्ट्रात मोठया प्रमाणात संघटना बांधणी चालू असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) तरुण पिढी मोठया प्रमाणात संघटनेत येत आहेत.रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद निवड ऐतिहासिक असून जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) विद्यार्थीच्या पाठिशी उभी राहणार आहे.

यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धम॔नांद गायकवाड,कोकण सचिव मारुती दादा गायकवाड, उपजिल्हा अध्यक्ष भीम टायगर गणेश चिकणे,तालुका अध्यक्ष किशोरभाई गायकवाड,सचिव अण्णा खंडागळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन आज डाॅ बाबासाहेब आंबेडकर सभागृह डिकसळ-शांतीनगर येथे मिटींग आयोजित करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष (महाप्रदेश) चद्रशेखर कांबळे,सरचिटणीस (महाप्रदेश)सुशिल महाडीक,यांच्याआदेशाचे पालन करून उत्तम गायकवाड यांची निवड करण्यात आली यावेळी गायकवाड यांचे रायगड जिल्हाध्यक्ष निवड बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.