रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक…

0
244

दि.04/11/2020
प्रतिनिधी, संतोष पवार

रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अटक करण्यात आलेली आहे. अभिनेता सुशांत सिंग प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर सतत निशाणा साधल्यानंतर रिपब्लिक टीव्ही सह इतर काही वाहिन्यांचा टीआरपी स्कॅमसमोर आला.

आणि अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली.आता आणखी एका प्रकरणांमध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे.अन्वय नाईक प्रकरणावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले होते.अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असुन नैराश्यातून आपण हे पाऊल उचलत आहोत.असा उल्लेख त्या पत्रात होता.मुंबई पोलीस आज चौकशीसाठी अर्नब गोस्वामी यांच्या घरी पोहोचले असता पोलिसांबरोबर त्यांनी जवळ जवळ दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पनवेल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अर्नब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.