Monday, July 15, 2024
Homeपुणेलोणावळारिपाइं (ए) च्या वतीने EVM दहन अभियानास पुणे येथून सुरुवात, राज्यभर चालणार...

रिपाइं (ए) च्या वतीने EVM दहन अभियानास पुणे येथून सुरुवात, राज्यभर चालणार अभियान…

लोणावळा: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपकभाऊ निकाळजे साहेब यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय महासचिव मा मोहनलाल पाटील, महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता ताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र सचिव मा अरुण भाऊ भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर या शहरातुन 28/2/2024 रोजी दुपारी 12 वाजता EVM दहन अभियानास सुरुवात होत असुन हे अभियान संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, तालुका,शहरात राबविले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले,,
या अभियानास, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, उपाध्यक्षा प्रियदर्शनी ताई निकाळजे, महाराष्ट्र युवक अध्यक्ष आमितभाऊ वर्मा,संघटक कैलास जोगदंड,संतोष बिचुकले संघटक प,मा,महा, मंगलताई सोनवणे उपाध्यक्ष महा,जयश्री गायकवाड सचिव प,महा,सचिन खरात अध्यक्ष पुणे जिल्हा,अंकुश चव्हाण युवक अध्यक्ष पुणे जिल्हा, अशोक जगताप पुणे शहर, प्रवीण पवार युवक आघाडी पुणे शहर रिटा मरिअम पुणे शहर गीता गायकवाड युवती पुणे शहर ,व सर्व पदाधिकारी या अभियानास उपस्थितीत राहणार असल्याचे आयोजक आप्पासाहेब गायकवाड, कार्याध्यक्ष प,महा व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सिध्दांत सुर्वे यांनी सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page