दामखिंडी धनगरवाडा येथे केले वाटप…75 कुटूंबाना केले सामानाचे किट वाटप…
खोपोली-( दत्तात्रय शेडगे) देशात कोरोना आजाराने थैमान घातले असून महाराष्ट्र सरकारने 1 जून पर्यन्त कडक लॉक डाऊन जाहीर केल्याने आहे अत्यावश्यक सेवा वगळता सगळी कडे लॉक डाऊन जाहीर असल्याने गोर गरीब लोकांचे यात अतोनात हाल होत आहेत याची दखल घेत रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दामखिंडी धनगरवाडा आणि आदिवासी वाडी येथे सामानचे वाटप करण्यात आले, यात 75 कुटूंबानी याचा लाभ घेतला
राज्यात कोरोनाची परिस्तिथी अत्यंत बिकट होत चालली असुन यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहेेत.
त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने कर्जत तालुक्यातील दामखिंडी धनगरवाडा आणि आदिवासी वाडीत सामानाचे किट वाटप करण्यात आले.यावेळी रिलायन्स फाउंडेशनचे तुकाराम बावदाने, माजी सरपंच लहू कोकरे ,कर्जत तालुका धनगर समाज अध्यक्ष रामदास कोकरे, सचिव गोविंद गोरे, अंकुश कोकरे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा गोरे, ज्ञानेश्वर घाटे, तुकाराम गोरे, विनायक कोकरे, रामा गोरे, नरेंद्र कोकरे, गणेश झोरे, उमेश कोकरे, तुकाराम गोरे, बाबू गोरे, संतोष आखाडे, आनंता आखाडे, दत्ता कोकरे, सुरेश आखाडे बाळू शांताराम गोरे, महेश आखाडे, रामा गोरे, आदी उपस्थित होते.