Monday, March 4, 2024
Homeपुणेलोणावळारेल्वे एक्सप्रेस मध्ये गहाळ झालेले 78 विद्यार्थ्यांचे मार्कशीट व सर्टिफिकेट हस्तगत करण्यात...

रेल्वे एक्सप्रेस मध्ये गहाळ झालेले 78 विद्यार्थ्यांचे मार्कशीट व सर्टिफिकेट हस्तगत करण्यात लोणावळा रेल्वे दूरक्षेत्र पोलिसांना यश…

लोणावळा दि.27 : लोणावळा रेल्वे स्टेशन वरून हैद्राबाद एक्सप्रेस मध्ये शिक्षिकेकडून गहाळ झालेले 78 विद्यार्थ्यांचे SSC परीक्षेचे मार्कशीट व HSC परीक्षेचे सर्टिपिकेट शोधण्यात लोणावळा रेल्वे दूरक्षेत्र पोलीसांना यश.


दि.11 ऑगस्ट 2021 रोजी लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका रोशन शेख या हैद्राबाद एक्सप्रेसने प्रवास करत असताना लोणावळा रेल्वे स्टेशनवर उतरताना SSC विद्यार्थ्यांचे 46 मार्कशीट व HSC विद्यार्थ्यांचे 32 सर्टिफिकेट असलेली बॅग रेल्वेमध्येच विसरून राहिली ही बाब रोशन शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी लोणावळा रेल्वे पोलीस दूरक्षेत्र कक्षात मिसिंग तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार एकूण 78 विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येणार असल्याने लोणावळा रेल्वे दूरक्षेत्र पोलिसांनी ताबडतोब कर्जत, कल्याण व मुंबई येथील पोलीस ठाणे व RPF यांना माहिती देऊन हरविलेल्या मार्कशीट व सर्टिफिकेटचा बारकाईने तपास करून 11 ऑगस्ट रोजी गहाळ झालेल्या मार्कशीट व सर्टिफिकेट अवघ्या पंधरा दिवसातच हस्तगत करण्यात यश संपादन केले आहे.

तसेच तपासात मिळून आलेले 32 HSC परीक्षांचे सर्टिफिकेट व SSC विद्यार्थ्यांचे 46 मार्कशीट आज लोनावळा रेल्वे पोलीस दूरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गोसावी यांनी लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सईद अहमद यांच्या स्वाधीन केले आहे.

लोणावळा रेल्वे दूरक्षेत्र पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमूळे तब्बल 78 विध्यार्थी पुढील वर्गात प्रवेश घेऊ शकतात. सदर कामगिरी बाबत लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाचे सर्व विध्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक वर्गाकडून रेल्वे दूरक्षेत्र पोलिसांचे कौतुक करून आभार व्यक्त करण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page