Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड." रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्ड संस्थेचा " स्तुत्य उपक्रम..

.” रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्ड संस्थेचा ” स्तुत्य उपक्रम..

” कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर ” शाळेस चार कपाटांची बहुमूल्य देणगी !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) नेहमीच अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना सढळ हस्ते मदत करणे , हे ” रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्ड संस्थेचे ” मुख्य उद्दिष्ट असल्याने त्यांची शैक्षणिक मदत थेट कर्जत पर्यंत पोहचली आहे . कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर शाळा अतिशय मेहनतीने व शाळेच्या सर्व कमिटीच्या सहाय्याने उभी राहिली असून या शाळेच्या कार्याध्यक्ष मीना प्रभावळकर यांच्या विशेष प्रयत्नातून ” अनंत चतुर्दशी ” च्या शुभ मुहूर्तावर रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्ड संस्थेचे अध्यक्ष सुरेश सर , सेक्रेटरी भावना मॅडम , रमेश सर , शाम सर , विजय सर , सुबोध सर आणि भूमा मॅडम ह्या सर्व मान्यवरांनी शाळेला आज प्रत्यक्ष भेट दिली , व देणगी रुपी कपाटे भेट दिली.

” विद्या विकास मंदिर ” शाळा हि गेली अनेक वर्षे कर्जतमध्ये समाजातील गोर – गरीब – गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून त्यांच्या पंखांना बळ देवून शैक्षणिक क्षेत्रात ” गरुड भरारी ” घेण्यास मदत करत असते . या शाळेला अधिक गतिशिल होण्यासाठी मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी ” अनंत चतुर्दशी ” या दिवशी रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्ड संस्थेने शाळेला चांगल्या उपक्रमाकरिता मदतीचा एक हात पुढे करत सामाजिक बांधिलकच्या नात्याने शाळेला साहित्य तसेच महत्त्वाचे कार्यालयीन दस्तऐवज ठेवण्या करिता चार कपाटे भेट म्हणून दिली.

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रद्धा मुंढेकर मॅडम यांनी केले. रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत शाळेच्या कार्याध्यक्ष मीना प्रभावळकर यांनी केले , तर भविष्यात ” रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्ड संस्थेकडून ” अजून देणगी रुपी मदत करण्याचा आपला मानस आहे , असे मत अध्यक्ष श्री. रमेश सर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले , तसेच संगीत क्षेत्रात उत्कृष्ट गायकांना प्रशिक्षण व गायनासाठी स्टेज देण्याची संधी असे आश्वासन माजी चेअरमन शाम माडिवाले यांनी केले , तर भावना मॅडम यांनी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी घ्यावी , असा बहुमूल्य विचार असल्याचे सांगीतले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा गाढे यांनी केले. भविष्यात शाळेचा अधिक ” नावलौकिक ” वाढविण्याचा आमच्या सर्व शिक्षकांचा प्रयत्न व मनोदय आहे , असे गाढे मॅडम यांनी मत व्यक्त केला , तर रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्ड संस्थेने शाळेला देणगी रुपी भेट वस्तू दिल्याने शाळेने त्यांचे आभार व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page