Tuesday, October 3, 2023
Homeपुणेलोणावळारोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे डॉक्टर्स डे उत्साहात साजरा.

रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे डॉक्टर्स डे उत्साहात साजरा.

लोणावळा : रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे डॉक्टर्स डे उत्साहात साजरा..जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे शहरातील डॉक्टरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.करोना काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णाची सेवा केली.

अनेकांचे प्राण वाचले या मानवी रूपातील देवदूत डॉक्टरांचा आज १ जुलै जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त रोटरी कडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुप्रसिद्ध डॉ.हिरालाल खंडेलवाल, डॉ.अभय कामात, डॉ.डॉली अग्रवाल,डॉ मिलिंद मुंदरगी, डॉ.अबोली सोमण,डॉ.प्रकाश पारेख या मान्यवरांना क्लबचे अध्यक्ष जयवंत नलावडे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


याप्रसंगी रोटरी क्लबचे पदाधिकारी पुंडलिक वानखेडे, बापूसाहेब पाटील, दिलीप पवार, आशिष मेहता ,मुस्तफा कॉन्टॅक्टर, गोरख चौधरी, धीरूभाई कल्याणजी,रवींद्र कुलकर्णी, कौस्तुभ दामले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टरांनी जागतिक डॉक्टर दिनानिमित्त केलेल्या सत्काराबद्दल विशेष आभार मानले.सुवर्णमहोत्सवी वर्षाची सुरुवात डॉक्टरांची कृतज्ञता व्यक्त करून केली आहे.रोटरी क्लब चे अध्यक्ष जयवंत नलावडे यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले.

- Advertisment -

You cannot copy content of this page