Sunday, December 8, 2024
Homeपुणेलोणावळारोटरी क्लब च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी मास्क चे वाटप..

रोटरी क्लब च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी मास्क चे वाटप..

रोटरी क्लब लोणावळा व रोटरी क्लब निगडी च्या वतीने लोणावळा आणि परिसरातील शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी 5000 मास्क आणि सॅनीटायझर चे वाटप व्ही पी एस हायस्कूल च्या प्रकाश हाॅल मध्ये करण्यात आले.

कोवीड 19 लाॅक डाऊन संपल्या नंतर इ 9 वी ते 12 वी चे वर्ग सूरू झाले आहेत शाळेत येणारे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष रो.प्रवीन घानेगावकर,लोणावळा रोटरी चे अध्यक्ष, रो.राजेश गायकवाड यांचे हस्ते संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांना मास्क आणि सॅनीटायझर कॅन सुपूर्द करण्यात आले.

या वेळी बोलताना रो. घानेगावकर यांनी लोणावळा परिसरातील शाळांसाठी अजून बरेच प्रोजेक्ट लोणावळा क्लब च्या सोबत करणार आहोत असे सूतोवाच केले रोटरी नेहमीच समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते हा उपक्रम ही सामाजिक बांधिलकी चा एक भाग आहे आणि फूल ना फुलाची पाकळी आम्ही देण्याचं प्रयत्न करीत असतो असे मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी रो गूरूदिप सिंग,रो रवी कुलकर्णी, रो विकास तारे यांनी विशेष मेहनत घेतली.यावेळी रो.विजय काळभोर,सौ.साधना काळभोर, रो मुकुंद मुळे,रो.केशव मांघे,रो.राम मांघे,रो.धिरूभाई कल्यानजी,रो.पुंडलीक वानखेडे,रो.खेमसिंह चौहान आदी मान्यवरांच्या उपस्थितत वितरण करण्यात आले.या वेळी व्हीपीएस च्या प्राचार्यां सौ.पिंगळे,बापूसाहेब तारे,विठ्ठल माळशिकारे,बाळासाहेब बलकवडे आणि बर्याच शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यकर्माचे प्रास्ताविक रो राजेश गायकवाड यांनी केले.सुत्र संचलन रो.रवींद्र कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन रो खेमसिंह चौहान यांनी मानले.

- Advertisment -

You cannot copy content of this page