लव्हाळवाडी पांगोळी येथील घराला भीषण आग…सुदैवाने जीवित हानी टळली…

0
1016

लोणावळा दि.12 : लव्हाळवाडी, पांगोळी येथील रहिवासी सागर गौतम गायकवाड यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.सागर हे लोणावळा येथील पारख क्लॉथ सेंटर ह्या कपड्याच्या दुकानात सेल्स मन म्हणून काम करत आहेत.

सागर हे शुक्रवारी तुंगार्ली येथील एका नातेवाईकांच्या इथे हळदी समारंभास गेले असता त्यांची बहीण सुवर्णा हिने मोबाईल वरून घराला आग लागल्याची माहिती सागरला दिली माहिती मिळताच सागरने त्याच्या मोटारसायकल वरून घराकडे धाव घेतली. घरी जाऊन पाहतो तर संपूर्ण घर अगीच्या थारोळ्यात असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

त्यावेळी गावातील मंडळी आग विझविण्याचा प्रयत्न करत होते परंतु लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फ़ोट झाल्याने आग काही आटोक्यात येईना अग्निशामक दलाला कळविले असता लोणावळा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने येऊन ती आग विझविली. अचानक लागलेल्या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसून घरातील लोकांच्या अंगावरील कपड्यांच्या व्यतिरिक्त सर्व घर जळून राख झाले आहे. सागर ह्यांनी सदर घटनेची माहिती लोणावळा शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.गायकवाड परिवाराचे घर संपूर्ण उध्वस्त झालेले आहे अशावेळी नव्याने प्रपंच उभा करण्यासाठी मदत मिळेल का ?