Wednesday, September 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडलसीकरण बाबतीत हलगर्जीपणा नको , तर आदिवासी वाड्यांमध्ये लसीकरण मोहीम राबवा,...

लसीकरण बाबतीत हलगर्जीपणा नको , तर आदिवासी वाड्यांमध्ये लसीकरण मोहीम राबवा, आमदार महेंद्रशेट थोरवे….

आ.महेंद्रशेट थोरवे यांनी कोरोना संदर्भात कर्जतमध्ये घेतली आढावा बैठक !

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे हे नेहमीच विकासात्मक व धोरणात्मक कामे करण्यात लोकप्रतिनिधी म्हणून अग्रेसर असल्याचे चित्र सर्वत्र पहाण्यास मिळत आहे.याच विकासात्मक दृष्टिकोनासोबत कर्जतमधील सर्व जनतेची या कोरोना काळात काळजी घेणे त्यांना आरोग्य विषयक सोयीसुविधा पुरविणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.

असे समजून कोविडची सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी कर्जत तालुक्यातील अधिका-यांची आढावा बैठक आज आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
यावेळी आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी पुढील येणाऱ्या कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात काय उपाययोजना करता येतील या संदर्भात महिती घेतली.

यात जास्तीत जास्त हा लसीकरणावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले.आजही कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्या पाड्यांमध्ये अनेक आदिवासी बांधव लसीकरणापासून वंचित आहेत त्यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून लवकरच त्यांना लसीकरणास प्रवृत्त करावे.याबाबतीत मार्गदर्शन केले.

आज पार पडलेल्या बैठकीत सर्वच शासकीय अधिकारी यांनी कोविड परिस्थितीत केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले व येणाऱ्या तिसऱ्या लाटे संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी समस्त अधिकारी वर्गास दिले.


सदरचा बैठकीस प्रामुख्याने प्रांत अधिकारी अजित नैराळे , कर्जत तहसिलदार विक्रम देशमुख ,कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी, कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील , वैद्यकीय अधीक्षक डॉ . मनोज बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोरे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, कर्जत न.प.चे नगरसेवक संकेत भासे यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page