लहानग्या हर्षचा जीव वाचविणा-या त्या ” देवदूत मातेचे ” ग्रेट वर्क !

0
295

कर्जतच्या नगराध्यक्षा सौ. सुवर्णा केतन जोशी यांची समयसूचकता..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
अस म्हणतात , कि देव तारी , त्याला कोण मारी ! या उक्तीप्रमाणे वेळप्रसंगी देवरूपी माणसे आज अनेक रुपात पहाण्यास मिळतात.त्यांच्या योग्य वेळी – योग्य ठिकाणी दाखवलेली समयसूचकता , एका क्षणात दाखविलेली तत्परता अडचणीत असलेल्या त्या मायूस जीवाचा ” तारणहार ” बनून कौतुकास पात्र ठरतो.

” तुमच्यामुळे , फक्त तुमच्यामुळेच माझ्या लेकराचा जीव वाचला ” त्या मातेच्या या एका ओळीने जीव वाचविणा-याला जणू खूपच मोठा सत्कार केल्यासारखं वाटत.अशाच एका मातेने ,एका लेकराचे प्राण आपली समयसूचकता दाखवून वाचविले.त्या देवदूत दुसऱ्या – तिसऱ्या कोणीही नसून कर्जत नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी या आहेत.

कर्जत तालुक्यातील अरवंद या गावातील कु . हर्ष मोडक ह्या मुलाला विजेचा शॉक लागून वायरला चिटकला होता , त्याप्रसंगी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांनी समयसूचकता दाखवून लाकडाने प्रहार केला असता हर्ष बाजूला फेकला गेला.लहान लेकराला विजेचा शॉक लागल्याने घाबरलेला हर्ष यांस बाजूला करून त्वरित त्याला पंपिंग करून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

अवघे ७ ते ८ वर्षाचा लहानग्या हर्षचे या समयसूचकतेमुळे प्राण वाचले. त्याची प्रकृती आत्ता स्थिर आहे. एक लहान जीवाचे प्राण , त्वरित वेळेत हालचाल करून, समयसूचकता दाखवून केल्याने देवदूत नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.