![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा(प्रतिनिधी): लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड कडून मदतीचा हात आदिवासी पाड्यातील एका कातकरी समाजाच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहून नव वधू वराला भावी आयुष्यात संसारासाठी लागणाऱ्या सर्व गृहउपयोगी वस्तू कन्यादान स्वरूपात भेट देण्यात आल्या.हा विवाह सोहळा मंगळवार दि.31 जानेवारी रोजी कुणे गाव येथे संपन्न झाला.
नव्याने सुरु करत असलेल्या संसारासाठी लागणाऱ्या गृहउपयोगी वस्तू कन्यादानात क्लब च्या वतीने देण्यात आल्या , त्या रुखवतात 5 ताटे (प्लेट्स), 5 ग्लासेस, 5 तांबे,5 कप,5 वाट्या, विविध प्रकारचे चमचे आदी स्टीलची भांडी आणि तवा, पोलपट बेलन, भिंतीवरचे घड्याळ, बेडशीट, उशी, बादली, मग, झाडू, सुपडी,मसाला बॉक्स, चटाई, नवरी मुलीच्या आईला साडी चोळी, नवरी मुलीच्या वडिलांना पॅन्ट शर्ट तसेच विवाह सोहळयासाठी आलेल्या ब्राम्हण तात्या ची दक्षिणा कन्यादान स्वरूपात देण्यात आली.
तसेच लोणावळ्यातील समाज सेविका सौ.स्वातीताई वर्तक यांनी मुलीसाठी 2 साड्या, काचेच्या कपाचा सेट तसेच इतर वस्तू अंदन म्हणून दिल्या.या कन्यादान सोहळ्याला लायन्स क्लब चे अध्यक्ष लायन अनंता ( अनिल ) गायकवाड,सचिव लायन अनंता पाडाळे,खजिनदार लायन तस्नीम थासरावाला प्रकल्प प्रभारी लायन सुनीता गायकवाड,लायन शारदा गायकवाड,लायन रेखा पाडाळे तसेच लोणावळ्यातील सामाजिक संस्थेच्या सौ. श्रिया राहाळकर, सौ.दिपाली वाकडकर,वैशाली दळवी उद्योजक रामदास शेलार, कुणे गावचे पोलीस पाटील गणपत गोजे आदी मान्यवरांनी विवाह सोहळ्यात उपस्थित राहून वधू वरास शुभाशीर्वाद दिले. सामाजिक बांधिलकीतून संपन्न झालेला हा विवाह सोहळा तेथील समस्त आदिवासी पाड्यातील लोकांसाठी आनंदाचा क्षण होता.