Monday, July 15, 2024
Homeपुणेलोणावळालायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमो तर्फे इको फ्रेंडली गणेशोत्सव..

लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमो तर्फे इको फ्रेंडली गणेशोत्सव..

लोणावळा – श्रावणी (चित्रा ) कामत
लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमो तर्फे “२०१९ गणपती मूर्ती कले क्षण ” अंतर्गत जमा झालेल्या श्री गणेश मूर्ती (डाग डूजी ,रंगरंगोटी ) करून त्यांनी सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कि क्लब तर्फे ची मूर्ती घरी प्रतिष्ठापना करावी आणि स्वेच्छादान स्वरुपात म्हणजेच सध्याची परिस्थिती पाहून स्व इच्छेने रक्कम देऊन किंवा परिस्थिती नसेल तर मोफत मध्ये अशी संकल्पना आहे .

आणि उत्सव झाल्यानंतर ती मूर्ती परत दान करू शकता जेणे विसर्जन केल्यास नदी चे पाणी प्रदूषित करते व आपण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी कमी पडतो …या कार्यात लायन सागर तावरे लायन यशश्री तावरे लायन सचिन कुटे लायन अर्पिता कुटे यांनी मूर्ती रंगवल्या .सगळा खर्च उद्योजक मुबीन इनामदार यांनी केला लायन क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमो चे अध्यक्ष सुरैया वाडीवाला लायन रंजना पुट्टोल लायन अपूर्वा लोहार लायन संजय लोहार लायन विश्वनाथ पुट्टोल लायन अमीन वाडीवाला यांचा बहुमोलाचा वाटा ..

- Advertisment -

You cannot copy content of this page