लायन्स क्लब डायमंडच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त बारा गुणवंत शिक्षकांचा सत्कार…

0
91

लोणावळा : शिक्षक दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडच्या वतीने लोणावळा येथील कुनेनामा गावातील जिल्हा परिषद शाळेतील बारा शिक्षकांचा सत्कार सन्मान करून शिक्षण दिन साजरा करण्यात आला.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपस्थित विध्यार्थी व पालकांना शिक्षनाचे महत्व समजावून जीवनात शिक्षकाचे महत्व समजावण्यात आले. तसेच शिक्षक दिनी शाळेच्या 12 शिक्षकांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.


यावेळी लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव,नगरसेवक, कुणीनामा सरपंच समवेत प्रदेश अध्यक्ष लायन एन राजेश्री शाह, झोन चेअरपर्सन लायन अध्यक्ष लायन अनंता गायकवाड, कोषाध्यक्ष लायन राजेश अग्रवाल, लायन नितीन अग्रवाल, लायन प्रशांत शाहसह लोणावळा लायन्स क्लब ऑफ डायमंडचे सर्व सदस्य आणि कुणेनामा येथील गावकरी व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.