Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडलायन्स क्लब व जन विकास केंद्राच्या वतीने आदिवासी बांधवाना सॅनिटायझर व मास्क...

लायन्स क्लब व जन विकास केंद्राच्या वतीने आदिवासी बांधवाना सॅनिटायझर व मास्क चे वाटप..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

लायन्स क्लब आणि जन विकास केंद्र खोपोली यांच्या वतीने कलोते आदिवासी वाडी येथील आदिवासी बांधवाना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.
देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून रायगड जिल्हा खालापूर तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहेत, याची दखल घेत सामाजिक बांधलकी जपत लायन्स क्लब नवी मुंबई (वाशी) व जन विकास केंद्र खोपोली यांच्या वतीने कलोते आदिवासी वाडीतील चारशे नागरिकांना सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले तर यावेळी संस्थेच्या वतीने चालू करण्यात आलेल्या फिरता दवाखाना याचाही लॉक डाऊन काळात आदिवासी बांधवाना मोठा फायदा झाला.

यावेळी अमरचंद शर्मा, एम के रामचंद्रन, दीपक पटेल, मनोज भारद्वा, जन विकास केंद्र खोपोलीच्या संचालिका सिस्टर पिंकी, सामाजिक कार्यकर्ते रामदास करकरे, कलोते ग्रामपंचायत चे माजी सरपंच रवी बांगरे, वाडी सेविका सुरेखा निररगुडे, राही वाघमारे, आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisment -