लोणावळा दि.11 : लोकविशेष फौंडेशनचा अनोखा उपक्रम भुशी, रामनगर येथील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून गुडघे दुखी व कंबर दुखी वर “कप थेरीपी “डॉ. डॉली अगरवाल यांच्या मार्फत करण्यात आली. भुशी, रामनगर येथील स्त्री पुरुष असे तब्बल 110 नागरिकांनी ह्या सेवेचा लाभ घेतला.
सदर उपक्रमास दत्ता जांभुळकर यांचे विशेष सहकार्य लाभले असून अमित चनाल, डॉ. डॉली अगरवाल, हिमांशू चोपडा, आरती साखरे, तृप्ती फाटक, निशा मराठे, सुनील बेंगळे, श्रावणी कामत, अविनाश जगताप, दिलीप गायकवाड, बजरंग मराठे इत्यादींनी परिश्रम घेतले.
पुढे लोणावळा खंडाळा परिसरातील प्रत्येक भागातील गरजू लोकांपर्यंत कप थेरपी पोहचवणार असून शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील गरजू लोकांना मदत करण्याचा पवित्रा लोकविशेष फौंडेशनचा असल्याचे अमित चनाल यांनी बोलताना सांगितले.