Sunday, December 8, 2024
Homeपुणेलोणावळालोकसभा निवडणूकीच्या पारश्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च..

लोकसभा निवडणूकीच्या पारश्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च..

वाकसई प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीच्या पारश्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा कार्ला व वाकसई परिसरात रूट मार्च काढण्यात आला.

13 मे रोजी मावळ लोकसभेसाठी मतदान होणार आहे , मतदानाची प्रक्रिया भयमुक्त वातावरणामध्ये पार पडावी , कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये, मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा तेसेच निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणामध्ये पार पडावी याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आज लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कार्ला, वाकसई, देवघर करंडोली, जेवरेवाडी,या परिसरामध्ये रूट मार्च काढण्यात आले.

लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व दुय्यम अधिकारी, पोलीस अंमलदार, शीघ्र कृती दलाचे पथक असा मोठा पोलीस ताफा सहभागी झाला होता.

वास्तविक पाहता लोणावळा शहर व ग्रामीण भागामध्ये सर्वत्र मतदान प्रक्रिया यापूर्वी शांततेमध्ये पार पडली आहे. मात्र तरी देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मतदारांना मतदानासाठी भयमुक्त वातावरणामध्ये बाहेर पडण्याचे आवाहन या रूटमार्च माध्यमातून करण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page