लोणावळा दि.11:लोणावळा भुशी डॅम जवळ असलेल्या
आंतर भारती बालग्राम मधील एकुण एकोणतीस जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते त्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश होता.बालग्राम येथील सर्व जण दिनांक २५/०४/२०२१ रोजी लोणावळा कोविड केअर सेंटर शाळा क्र.1 येथे कोरोना तपासणी केली असता 29 जनांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळुन आले तदनंतर त्यांना लोणावळा CCC चे आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका खराडे, डॉ.सिंघम यांच्या मार्गदर्शनाखाली बालग्राम संस्थेचे प्रकल्प प्रमुख डॅनियल सर यांनी समुद्रा इंस्टीट्युट कोविड सेंटर टाकवे येथे उपचारासाठी दाखल केले.
त्यावेळी तेथील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी रुग्णांवर योग्य ते उपचार सुरु केले. समुद्रा कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.मिलींद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. चव्हाण, डॉ. सिंघम,डॉ. ब्रिजेश,डॉ. सीमा शिंदे,डॉ, सोनाली नर्स रेश्मा शेख,आम्रपाली कांबळे, सोनाली केमुस्कर, आशा भगत,अमोल गडमवाड यांनी सर्व रुग्णांवर वेळोवेळी योग्य ती ट्रीटमेंट केली.
आज चौदा दिवसानंतर ह्या सर्व रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली असून कोविड सेंटरकडून आज चौदा दिवसानंतर सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.सर्वांना डिस्चार्ज मिळाला हे कळताच सर्व लहान्या रुग्णांच्या चेहऱ्यावर एकदम प्रसन्नता आली आणि सर्वांना अतिशय आनंद झालेला दिसून आला.
यावेळी अंतरभारती बालग्राम संस्थेचे प्रकल्प प्रमुख डॅनियल सर, सौ.सुनीता प्रभाकर मॅडम आणि सर्व सदन माता यांनी सर्व कोविड योद्धांचे आभार मानले तसेच डॉक्टर व कर्मचारी यांच्या बरोबर विशेष कामगिरी करणारे आमदार सुनिल अण्णा शेळके प्रणित रुग्णवाहिका चालक महादेव भवर आणि माजी शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या प्रयत्नाने उपलब्ध झालेली रुग्णवाहिकेचे चालक श्याम बाबु वाल्मिकी यांनी सर्व रुग्णांना कोवीड सेंटर येथे नेऊन सोडणे व पुन्हा बालग्राम मध्ये आणण्याची महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल दोन्ही रुग्णवाहिका चालकांचे ही संस्थेच्या वतीने कौतुक करून आभार मानण्यात आले.
तसेच ह्या कठीण काळात संस्थेच्या मदतीसाठी अनेक मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले. त्या सर्वांचे आभार संस्थेचे प्रकल्प प्रमुख डॅनियल सर यांनी मानले.