Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा उपविभागीय सहाय्यक अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची कारवाई, लाखो रुपयांचा गुटखा हस्तगत…

लोणावळा उपविभागीय सहाय्यक अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची कारवाई, लाखो रुपयांचा गुटखा हस्तगत…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या पथकाने लोणावळ्याजवळील कुसगाव गावात आज धडाकेबाज कारवाई करत तब्बल 25 लाख 67 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल यामध्ये 342 पोती गुटखा व वाहन असा मुद्देमाल जप्त केला.
लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांना तसेच अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये मौजे कुसगाव गावाच्या हद्दीमध्ये पुणे ते मुंबई एक्स्प्रेस हायवे रोडवर पुणे ते मुंबई बाजुकडे जाणारे लेनवर आय.आर .बी. कार्यालयाचे समोरील बाजूस हायवेवर कि.मी.नं. 57/600 जवळ सापळा लावण्यात आला. कर्नाटक राज्यामधून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा ट्रक नं. KA 32 AA 1138 यास दोन टिम करुन पकडून पहाणी केली असता यामध्ये कि. रु. 10,67, 040/- रुपयांची गुटख्याच्या पुढयांनी भरलेली 342 पोती . कि. रु. 15 लाख रुपयांचा ट्रक नं. KA 32 AA 1138 असा एकुण 25,67,040/- रुपयांचा माल जप्त करणेत आला आहे.
यामध्ये अन्न व औषण प्रशासन, महाराष्ट्र, पुणे यांना दिलेल्या पत्राचे आधारे त्यांनी 1) ट्रक चालक मोहम्मद खलील जमाल अहंमद शेख (वय 40 वर्षे, रा. मश्जितजवळ लालगीरी, ता. बहामपूर, – जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक, 2) ट्रक क्लिनर नसरुद्दीन बुरानसाहब खडखडे (वय 35 वर्षे, स. खडखडगल्ली डुबलगुडी, ता. हुमनाबाद, जि. बिदर, राज्य कर्नाटक व 3) ट्रक मालक सदाम उर्फ सय्यद गुडुसाहब मुल्ला दस्तगीर रा. मुल्ला गल्ली, नरोना गुलबर्गा, नरोना गुलबर्गा, कर्नाटक यांचेविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता अधिनियमासह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहा पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, सहा पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पो. हवा. अंकुश नायकुडे, पो. हवा. स्वप्नील अहिवळे, पो.हवा चंद्रकांत जाधव, पोलीस हवा मंगेश थिगळे, पोलीस नाईक अमोल शेंडगे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे, चालक अंकुश पवार, चालक अक्षय सुपे यांनी केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page