Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा उर्दू माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विध्यार्थ्यांकडून शाळेसाठी भेट वस्तू…

लोणावळा उर्दू माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विध्यार्थ्यांकडून शाळेसाठी भेट वस्तू…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्सहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमात विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह तर होताच परंतु त्यापेक्षा शाळेला शेवटचा निरोप देतोय या भावनेतून विद्यार्थ्यांचे नेत्र पाणावलेले दिसले.
दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी शाळेकडून या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 2022/2023 मधील दहावीच्या विध्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.विध्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले. यावेळी शाळेला अखेरचा निरोप देताना हृदय कासावीस होऊन पाणावलेल्या नेत्रांनी विध्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेची गरज पाहता या विध्यार्थ्यांच्या वतीने शाळेला पाण्याचे जार भेट देण्यात आले.तसेच सर्व गुरुजनांना भेट वस्तू विध्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आल्या. विध्यार्थ्यांनी शाळेतील दहा वर्षाचा अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
यावेळी विध्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मिनारा मस्जिद ट्रस्टी हाजी मुस्ताक काठेवाडी, व्हाईस चेअरमन हाजी रफिक हुसेन शेख, हाजी सईद खान( कॉन्ट्रॅक्टर ),जाकीर खलिफा, सर्फराज शेख, लतिफ खान सर, फिरोज रफिक बागवान,मजहर खान, सनी गवळी,बाळकृष्ण बलकवडे सर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सईद खान आणि सर्फराज शेख यांनी मुलांना कॅडबरी चॉकलेट, पेन आणि गुलाब पुष्प देऊन विध्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजिया खान या विध्यार्थिनीने केले तर आभार मुख्याध्यापक सईद नल्लामंडू सर यांनी मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page