Tuesday, September 26, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा खंडाळा टुरिस्ट टॅक्सी संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल शेडगे यांची सर्वानुमते निवड...

लोणावळा खंडाळा टुरिस्ट टॅक्सी संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल शेडगे यांची सर्वानुमते निवड…

लोणावळा दि.21 : लोणावळा – खंडाळा टुरिस्ट टॅक्सी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवड आज करण्यात आली. लोणावळा खंडाळा टुरिस्ट टॅक्सी संघटनेच्या उपाध्यक्ष पदावर असताना टॅक्सी चालक व मालक यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे अमोल शेडगे यांची अध्यक्ष पदासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली.

अमोल शेडगे हे सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर होते.यांनी त्यांच्या उपाध्यक्ष पदाच्या कार्यकालात टॅक्सी संघटनेचे प्रश्न सोडविण्यासाठी व टॅक्सी चालक आणि मालक यांच्या अधिकारासाठी अनेक वेळा उपोषण केले आणि आंदोलनही केले. तसेच लोणावळा खंडाळा टुरिस्ट टॅक्सी संघटनेचा सध्या ऐरणीवर असणारा प्रश्न म्हणजे लोणावळा परिसरात “ओला उबेर “च्या वाहनांना लोणावळ्यातून हद्दपार करून स्थानिक टुरिस्ट टॅक्सी चालक व मालकांना रोजगार मिळवून देणे तसेच त्यांच्या अधिकारासाठी वेळ आलीतर ठोस पाऊल उचलले जाईल असा पवित्रा यावेळी बोलताना अमोल शेडगे यांनी घेतला.

त्यावेळी लोणावळा खंडाळा टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे उपाध्यक्ष हेमंत मेने, खजिनदार मंगेश कदम, सचिव अविनाश तिकोणे,नरेंद्र निकाळजे,राजू पटेल, किशोर पवार,लक्ष्मण दाभाडे, विष्णू शेळके, अतुल अंबोरे, राजू मराठे, सुधीर कोकाटे, नितीन गोणते व टॅक्सी संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते उपस्थितांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल शेडगे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

- Advertisment -