Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा खंडाळा दरम्यान रेल्वेच्या धडकेने पन्नास वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू….

लोणावळा खंडाळा दरम्यान रेल्वेच्या धडकेने पन्नास वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू….

लोणावळा (प्रतिनिधी): गाडी क्र.11139 डाऊन या धावत्या रेल्वे गाडीखाली आल्याने एका 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना. दि.20 रोजी रात्री 1 वा. च्या सुमारास लोणावळा खंडाळा दरम्यान रेल्वे कि. मी. क्र.127/01-02 जवळ घडली. अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने सदर इसमाचा मृत्यू झाला आहे.
लोणावळा लोहमार्ग दूरक्षेत्र चे पोलीस अंमलदार ए. डी. जाधव यांनी दिलेल्या माहिती नुसार मयताचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. मयताचे वय अंदाजे 50 वर्षे आहे. उंची 5 फूट 9 इंच, शरीर बांधा मजबूत, रंग गहू वर्णीय, चेहरा गोल, दात पांढरे, कान मध्यम, कपाळ मोठे, मिशी काळी व कोरलेली, डोक्यावरचे केस काळे असे असून मयताच्या अंगावर मरूम रंगाचे बनियान, काळ्या रंगाची फुल पॅन्ट व माचो कंपनीची मरूम रंगाची अंदारविअर नेसनीस असून मयताचे शरीर विच्छेदन करून मयत खंडाळा येथील शव विच्छेदन केंद्रात ठेवण्यात आले आहे. सदर मयत इसम अनोळखी असून याबाबत कोणाला काहीही माहिती असल्यास लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page