लोणावळा ग्रामीण परिसरातील गौ तस्करी विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात निवेदन…

0
597

लोणावळा दि. 02 : रात्रीच्या वेळी गायी व वासरांना बेशुद्ध करून पळवून नेण्याचा प्रकार पहाटे 1:30 ते 2:00 वा. च्या सुमारास ओळकाईवाडी कुसगाव येथील सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ओळकाईवाडी कुसगाव येथील शिंदे हॉस्पिटल जवळ काही लोक दुचाकी व एक स्कॉर्पिओ वाहनातून येऊन त्या भागातील गायी व वासरांना पाव खायला देत भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध अवस्थेतील काही जनावरे उचलून कत्तलखान्यात घेऊन गेले आहेत.

तर काही वासरे बेशुद्ध अवस्थेत जागेवरच पडून आहेत. हा सर्व प्रकार तेथील सिसी टिव्ही फुटेजमध्ये कैद झालेला आहे. हा सर्व प्रकार दैनिय असून यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत आणि समाजात कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होऊ नये म्हणून या गुन्हेगारांना ताबडतोब अटक करण्यात यावी असे निवेदन वारकरी सांप्रदाय, विश्व् हिंदू परिषद व हिंदू समिती लोणावळा शहर आणि ग्रामीणच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

सदर निवेदन लक्षात घेता लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी आम्ही या गुन्हेगारांच्या मागवर लागू आणि लवकरात लवकर त्यांना अटक करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले. यावेळी बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगडे, पुणे जिल्हा सहसंयोजक सुधीर राइलकर, जिल्हा उपाध्यक्ष गोपीचंद कचरे, तालुका अध्यक्ष महेंद्र अजवले, तालुका संयोजक प्रशांत ठाकर, पवना प्रखंड संयोजक तानाजी असवले, आंध्र प्रखंड संयोजक लक्ष्मण शेलार व कार्यकर्ते उपस्थित होते.


यापूर्वी ही असे प्रकार लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी घडले आहेत परंतु आज हे प्रकार सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे उघडकीस आले आहेत तरी या प्रकाराला कुठेतरी आळा बसावा यासाठी नागरिकांनी सतर्क रहा आणि असे प्रकार घडताना आढळ्यास ताबडतोब लोणावळा पोलीस ठाण्यास कळवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.