Tuesday, October 3, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा ग्रामीण पोलिसांकडून 100 गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून 100 गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

लोणावळा कोरोनाकाळात चोख कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांच्या खाकी वर्दीत एक देव माणूस असतो हे दाखवून देणारे प्रशंसनीय कार्य लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हातावर पोट असलेल्या गरजूंना तसेच अतिशय हलाकीची परिस्थिती असणाऱ्या वाड्या वस्त्यांवरील गरजू नागरिकांना दोन दिवसांपासून परिसरातील वाड्या वस्त्यांवर जाऊन जवळ जवळ महिनाभर पोटभर अन्न पुरेल असे एकूण 100 नागरिकांना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले.
माणुसकीचे दर्शन घडविणारे अप्रतिम कार्य लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून त्यावेळी पोलीस हवालदार युवराज बनसोडे, शकील शेख, कुतूब खान, विशाल जांभळे, प्रविण उकिर्डे, कैलास लबडे इ. पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page