लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे जालना जिल्ह्यातील खुनातील फरार आरोपी ताब्यात…..

0
858

दि. 29/7/2020 रोजी जालना जिल्ह्यातील लोही लगड गावातून खून करून फरार झालेल्या आरोपीस लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वरसोली टोल नाका येथून दुपारी 3:00 वा. सुमारास ताब्यात घेतले. मिळालेल्या माहिती नुसार लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो. हवा. काळे ( 55), पो. ना. ठोसर ( 1978), पो. ना. शेख ( 404), पो. शी. डुंबरे ( 1027), होमगार्ड सानप, होमगार्ड पावसे हे सर्व सकाळपासून वरसोली टोलनाका या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडत असताना.

वाहनांची तपासणी करत होते त्याचवेळी एक इसम त्याचे मोटर सायकल क्रमांक MH 20 DY 1054 यावरून येत असताना त्यास पोलिसांनी थांबवून त्याकडे चौकशी केली असता तो काही माहिती देत नव्हता त्यामुळे पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे आधारकार्ड सादर केले त्यामार्फत त्याचे नाव बप्पासाहेब एकनाथ टकले, रा. लोही लगड, ता.अंबड, जि. जालना अशी माहिती मिळताच कार्यावर असणाऱ्या पोलिसांनी पोलीस कंट्रोल रूम ला फोन करून जालना जिल्हा कंट्रोल रूम वरून अंबड पोलीस स्टेशनचे पो. स. ई. चाटे यांचा संपर्क नंबर घेऊन सदर इसमाबद्दल काही तक्रार नोंद आहे का असे विचारले असता.

सदर इसम नामे बप्पासाहेब एकनाथ टकले हा त्याच्याच पत्नीचा गळा दाबून खून करून फरार झाला आहे आणि त्याच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशनला गु. र. नं. 368/2020, भा. द. वी. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला ठेवले, त्यांनतर अंबड पोलीस स्टेशनचे पो. स. ई. चाटे आणि तपास पथक हे त्यास नेण्यासाठी आले असता लोणावळा ग्रामीण पोलीसांनी आरोपीस त्यांच्या हवाली केले.