Sunday, April 21, 2024
Homeक्राईमलोणावळा ग्रामीण पोलिसांची दबंगिरी, दरोड्यातील अज्ञात आरोपी 24 तासात जेरबंद...

लोणावळा ग्रामीण पोलिसांची दबंगिरी, दरोड्यातील अज्ञात आरोपी 24 तासात जेरबंद…

लोणावळा दि.21: लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आतवण गावचे हद्दीत घुबड तलावाजवळ सहारा ते लोणावळा रोडवर दिनांक 18/01/2021 रोजी रात्री 08:30 वाजन्याच्या सुमारास 05 ते 06 अज्ञात व्यक्तींनी हमिदुल्ला नसीबउल्ला खान यास आडवून त्याच्या कडून त्याची
यामाहा कंपनीची मोटरसायकल,सोन्याची चैन,रोख रक्कम 14 हजार 700 रुपये असा एकूण 1 लाख 67 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला होता.

त्यासंदर्भात लोणावळा ग्रामीण पोस्टेला गु र नं 19/2021 IPC 395 प्रमाणे गुन्हा दाखल केला असता सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध करीता लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी तात्काळ अनिल लवटे पोलिस उप निरीक्षक, पोलिस हवालदार युवराज बनसोडे, पोलिस नाईक मयूर अबनावे, रफिक शेख, पोलिस शिपाई रईस मुलाणी, हनुमंत शिंदे होम गार्ड शुभम कराळे, पोलिस मित्र योगेश हांडे असे पथक तयार केले.


सदर पथकाने गुन्ह्यातील अज्ञात आरोपीची गोपनीय माहिती काढली काढून सदर गुन्हा सनी सुरेश मराठे, रोशन कैलास वाकोडे, गोविंद काशिनाथ हिरवे, संतोष शंकर आखाडे, कल्पेश ज्ञानेश्वर मराठे यांनी केल्याची माहीती मिळाल्यास सदर आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे अधिक तपास केल्यास सदर आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्हा दाखल झाल्यापासून फक्त 24 तासाच्या आत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन याचा झडा लावला. आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेली यामाहा कंपनीची मोटरसायकल, सोन्याची चैन व रोख रक्कम 14 हजार 700 रु. कीं. मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे हे करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page