Thursday, October 10, 2024
Homeक्राईमलोणावळा ग्रामीण पोलिसांचा छापा एकूण 2 कोटी 5 लाखाचा बनावट गुटखा मुद्देमाल...

लोणावळा ग्रामीण पोलिसांचा छापा एकूण 2 कोटी 5 लाखाचा बनावट गुटखा मुद्देमाल जप्त…

मावळातील फांगणे येथील गुटखा कंपनीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा छापा एकूण 2 कोटी 5 लाखाचा मुद्देमाल जप्त…

लोणावळा दि.2: लोणावळा ग्रामीण पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी गुटखा बनवणाऱ्या कंपनीवर छापा मारत 02 कोटी 05 लाख 54 हजार रुपयेचा मुद्देमाल केला जप्त.लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांना त्यांच्या गुप्त बातमी दाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, मौजे फांगणे, ता.मावळ जि. पुणे या गावाच्या हद्दीत काही इसम बेकायदेशीरपणे गुटखा बनविण्याचा कारखाना चालवत आहेत.

अशा मिळाले ठोस माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा ए. एस.पी. नवनीत कुमार कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवलदार युवराज बनसोडे, शकील शेख, कुतुब खान, पोलीस नाईक देविदास चाकणे, मयुर अबनावे पोलीस शिपाई स्वप्नील पाटील, मच्छिंद्र पानसरे, होमगार्ड अनिकेत इंगवले, वाजे पावशे यांच्या मदतीने फागणे गावाच्या हद्दीतील कारखान्यावर जाऊन छापा टाकला असता.

त्या ठिकाणी आर. एम. डी, पान मसाला, बाबा, कमला पसंद, शाम बहार, केसर एलियाची, पान बिलास, हिरा, जम जम अशा प्रकारचे वेगवेगळे गुटखा बनविण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या कंपनीचे साहित्य, वेगवेगळ्या प्रकारचे व रंगाचे केमिकल भरलेले मोठे मोठे कँड, मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियमची भांडी, दोन इलेक्ट्रॉनिक मिक्सिंग मशीन व अनेक प्रकारची औषधी द्रव्य असा एकूण सुमारे 2 कोटी 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला असून त्यातील आरोपींवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर हे स्वतः करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page