लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पाच स्वच्छता दुतांचा सन्मान…

0
291

लोणावळा : 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन प्रांगणात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.

त्यावेळराजेंद्र पाटील यांनी उपस्थित सर्वांना 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मोठया आनंदात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन च्या संकल्पनेतून स्वच्छता दूत म्हणून 1) प्रेम करणसिंग विश्वकर्मा 2) अजय करणसिंग विश्वकर्मा 3) बाबू नारायण खेडेकर 4) जयराम बाबू शिंदे 5) सुमन सुनिल भेनके यांना “स्वच्छता” दूत म्हणून सन्मानचिन्ह,व पुष्प गुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्यासह लोणावळा ग्रामीण, लोणावळा शहर व उपविभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी, अंमलदार, होमगार्ड व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिन अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडला.