Monday, September 26, 2022
Homeपुणेलोणावळालोणावळा ग्रामीण पोलीसांकडून गाव बैठकांतून दिले गणेशोत्सव साजरा करण्याचे मार्गदर्शन...

लोणावळा ग्रामीण पोलीसांकडून गाव बैठकांतून दिले गणेशोत्सव साजरा करण्याचे मार्गदर्शन…

लोणावळा : ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील भागात यंदाचा गणेशोत्सव कोरोनाचे नियम पाळून साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा असे आवाहन लोणावळा ग्रामीणचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने हद्दीतील गावा गावांत जाऊन बैठकांच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात आले आहे.


मागील दोन वर्षांपासून कोरोना साथरोगामुळे विविध सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले जात आहे. यावर्षी देखील सर्व उत्सावांवर कोरोनाचे सावट कायम असून तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवली जात असल्याने नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत गर्दी टाळून घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन मोरे यांनी हद्दीतील गावांना केले आहे.

त्यादरम्यान लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेहेरगाव, दत्तवाडी, ओळकाईवाडी, कुसगाव बू. मळवली, सावंतवाडी, महागाव, तिकोना पेठ, गेवंडे वसाहत या गावांना पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गावांतील गणेश मांडळांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांची बैठक घेऊन कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन गृहविभाग यांच्याकडील परिपत्रकामधील दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात आली आहे. तसेच इतर गावांनाही बैठक आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page