लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याकडून आयोजित केलेल्या तक्रार निवारण दिनास उदंड प्रतिसाद…

0
196

लोणावळा दि.20 : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आज कृष्णाई रिसॉर्ट येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ .अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार व अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे तसेच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले . तसेच या तक्रार निवारण दिनास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रारिंचे निराकरण होणार असल्याने हद्दीतील शेकडो तक्रारदारांचा यावेळी प्रतिसाद लाभला.

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक , पोलीस हवालदार व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते . ज्या नागरिकांचे तक्रार अर्ज प्रलंबित आहेत , त्यांना देखील या कार्यक्रमात बोलावून अर्जदार व गैरअर्जदार यांना समोरासमोर बोलावून तक्रार निवारण केले जात होते . यावेळी सदर उपक्रमातून लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून 103 तक्रारींचा निपटारा करण्यात आला , यात 55 वरिष्ठ स्तरावरील तर 48 स्थानिक तक्रारींचा समावेश होता.

त्याचबरोबर याठिकाणी लोणावळा शहर पोलिसांच्या माध्यमातून लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल , सहा.पो.नि. संदेश बावकर , पो.उप.नि. मुजुमदार यांच्या उपस्थितीत तब्बल 70 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.